बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई | शाळा सोडल्याचा दाखला असेल तरच आतापर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळत असायचा. परंतु, आता महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने यासंदर्भात एक मोठा निर्णय घोषित केला आहे. ज्यानुसार शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक शाळा या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क न भरल्याने दाखला देण्यासाठी अडवणूक करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आता जन्माचा दाखला पाहून संबंधित विद्यार्थ्याच्या वयानुसार त्याला पुढील वर्गात थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे इथून पुढे आता शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतेवेळी बंधनकारक असणार नाही. शाळेची फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांना या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसली आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाचं महाराष्ट्रभरातील पालकांनी स्वागत केलं आहे. तसेच आता पालकांची व विद्यार्थ्यांची पिळवणूक काही प्रमाणात कमी होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

‘समांतर 2’ वेब सिरीज ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

राखी सावंतनं सांगितली लस घेण्याची अनोखी पद्धत, म्हणाली….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More