मुंबई | भारतीय संगीताने मला जगातील ओळख करुन दिली. संगीत साधनाने आज करोडो माझ्यावर आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी पहिल्यांदा भारतीय नागरिक आहे आणि नंतर संगीतकार, गायक आहे, असं वक्तव्य प्रसिद्ध गायक अदनान सामीने केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होता.
माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. मी भारतात वाढलो शिक्षण पूर्ण केलं. माझी पत्नी जर्मनीची आहे. पण मी भारतच निवडला. कारण माझं हृदय नेहमी भारतीयांसाठीच धडकत राहिले आहे, असं सामी म्हणाला.
एक भारतीय म्हणून मला नेहमीच देशाचा आभिमान आहे. भारतीय संगीताने मला जगात ओळख मिळवून दिली. संगीतामुळे आज करोडो भारतीय माझ्यावर आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. मी प्रथम एक भारतीय नागरिक आहे आणि त्यानंतर संगीतकार आणि गायक आहे, असं सामीने सांगितलं आहे.
दरम्यान, अदनान सामीला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. सामीला पुरस्कार जाहीर केल्याने मोठा वाद उफाळला होता. त्याच्या पद्मश्रीला अनेकांनी विरोध केला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
थोरातांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?
आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!
महत्वाच्या बातम्या-
सोनिया गांधींना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाण म्हणतात…
…म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करवीशी वाटते- चंद्रकांत पाटील
उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री…- शरद पवार
Comments are closed.