बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात येत आहे. मागील महापालिका निवडणुकीत सत्ता आली तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार असं आश्वासन शिवसेनेनं दिलंं होतं. आता औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यानं शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा उचलून धरताना दिसत आहे. अशातच आता अॅड गुणरत्न सदावर्ते (Advt Gunaratna Sadavarte) यांनी थेट इशारा दिला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांना इशारा दिलाय. महापुरूषांच्या नावानं असलेल्या शहरांचा उल्लेख करताना एकेरी नाही तर आदरपूर्वक करावा, असं सदावर्ते म्हणाले आहेत. अशोक चव्हाण यापुढे एकेरी नावाने संभाजीनगर म्हटलेलं चालणार नाही, असंही अॅड गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

औरंगाबादमध्ये येण्यापूर्वी मला अनेक ठिकाणी अडवण्यात आलं होतं. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. माझं कोणत्याही युनियनचं दुकान नाही. मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा अखेरच्या श्वासापर्यत पुढे नेईल, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाचं विलीनीकरण शासनात होऊ नये, यासाठी शरद पवार जबाबदार असल्याचं देखील यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर पेपरफुटीच्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांचं नाव आरोपींच्या यादीत टाकावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आणखी 2 बँकांचं खासगीकरण?, निर्मला सीतारमन यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली, त्यावर मोदींनी कळस चढवला”

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

ठाकरे सरकार पडणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More