बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्यांनी शरद पवारांवरील आरोप थांबवावे, नाहीतर…”

अहमदनगर | भाजप नेते किरीट सोमय्यांनी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर केले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलाचं तापलेलं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शारदाताई लगड यांनी सोमय्यांना इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी आमचे नेते खासदार शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. त्याचबरोबर सोमय्या महाविकास आघाडी सरकारची बदनामी करत आहेत. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धिची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. त्यांनी ते आरोप थांबवावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातही फौजदारी कारवाई केली जाईल, असं शारदाताई लगड यांनी सांगितलं.

सोमय्या यांनी हवेत गोळीबार करू नये. अनेक रथीमहारथींनी पवार यांच्यावर आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला नाही. उलट तुम्ही आमचे नेते पवार यांचा आदर्ष घेऊन समाजात कसे वागलं पाहिजे हे शिकून घ्या. तुम्ही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीटी भीती दाखवू शकत नाही. ईडी काय तुम्हाला तुमच्या घरची मालमत्ता वाटते का? असा सवालही अॅॉ शारदाताई लगड यांनी सोमय्यांना विचारला.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांना ईडीची नोटीस देखील आली आहे. अशातच आता शारदाताई लगड यांनी केलेल्या टीकेवर सोमय्या काय प्रतिक्रिया देणार आहेत. ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मी ललित मोदींचं कौतुक केलं, बाकी काही नाही”

“दिल्ली, युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना …”

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More