ऑनलाईन क्लासेसचे लहान मुलांवर होतायेत दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ उपाय
मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीने सर्वांना ग्रासलं आहे. कोरोनामुळे सर्वंच क्षेत्रांना मोठा फटका बसला असून दुष्परिणामही जाणवत आहेत. कोरोनाचा मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. देशभरात ऑफलाईन पद्धतीने शिक्षण बंद असल्यामुळे मुलांचे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात. ऑनलाईन क्लास करत असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. यावर तज्ज्ञांनी उपाय सांगितले आहेत.
ऑनलाईन क्लास करत असताना चुकीच्या पद्धतीने बसणे आणि कोणत्याही शारिरीक हालचाली न करता जास्त वेळ बसणे आरोग्यसाठी हानिकारक आहे. यामुळे लहान मुले मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होत आहेत. अनेक मुलांचे वजनही वाढले आहे. तसेच लहान मुलांमध्ये स्ट्रेस वाढला आहे आणि अस्वस्थ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासंदर्भात शुभांग अग्रवाल यांनी मत मांडलं आहे.
मुलांचे सुर्यप्रकाशामध्ये जाणे बंद पडले आहे. मुलांना मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. मुलांचं ऑनलाईन क्लासेसला चुकीच्या पद्धतीने बसणं हे मुख्य कारण आहे. जे अधिक वेळ स्क्रीनवर घालवतात त्यांनी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यावर उपाय म्हणून कॅल्शिअमयुक्त आहार, सकाळच्या सुर्यप्रकाशात जाणे, प्रत्येक अर्ध्या तासाने ब्रेक घेण्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, मुलांनी इनडोअर किंवा आऊटडोअर अॅक्टिवीटीमध्ये भाग घ्यावा. स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावेत. ऑनलाईन क्लासेसला बसताना पाठीला योग्य आधार घेवून खुर्चीवर बसावे. तसेच शिक्षकांनी ऑनलाईन क्लास घेत असताना मुलांना काही अॅक्टिवीटी करायला लावाव्यात. यामुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल.
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळीचे सगळे निर्बंध मागे
“मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तीनं अंतर्वस्त्र घातली असली तरी…”; न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
…तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेेमात पडेल, तज्ज्ञांनी सांगितली ट्रीक
“महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमतानं सरकार आणणार”
Comments are closed.