लाडकी बहीण नेमकी कुणाची?, अजित पवारांना मान्य नाही ‘मुख्यमंत्री’ शब्द?

Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीत महिलावर्गाच्या मतांच्यादृष्टीने लाडकी बहीण योजना ही गेंमचेंजर ठरणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बाबतीत आघाडीवर आहेत. ते राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत.

महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरु केलेलं ‘पिंक पॉलिटिक्स’ चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राज्यभरात आपली जनसन्मान यात्रा करत राज्य पिंजून काढत आहे.

लाडकी बहीण नेमकी कुणाची?

अजित पवारांचा संपूर्ण फोकस हा या योजनेवर असून राष्ट्रवादी याचा प्रचार करताना दिसत आहे. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून सध्या लाडकी बहीण नेमकी कुणाची?, असा प्रश्न विचारला जात आहे. कारण या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं कुठेच दिसलं नाही. यावरून अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ शब्द मान्य नाही?, असा सवाल केला जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून तिथे ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. यावरूनच अजित पवार यांची ही जाहीरात वादात सापडली आहे.

Ladki Bahin Yojana | “दादा स्वतःच्या पैशातून योजना चालवत आहे का?”

विरोधकांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल काँग्रेसने करत अजितदादांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मोठी अपडेट, आराध्याला अडवलं!

बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल

अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

हरतालिका व्रताच्या दिवशी ‘या’ गोष्टी करा, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!

‘तू वेळ आणि तारीख सांग, मी…’; ‘हा’ भाजप नेता थेट नितेश राणेंना भिडला