बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं आहे. पहिल्याच दिवशी कर्नाटकमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबत निषेध प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सरकारच्या वतीनं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मांडला. यावेळी उपस्थित आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एक चुकीची घोषणा गेली पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागलीच आमदारांच्या निदर्शनास ती बाब आणून दिली, याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

एकनाथ शिंदे हे सभागृहात पुढे प्रस्ताव मांडत असताना शिवसेना आमदार माजी मंत्री दिवाकर रावते यांनी उभं राहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका केली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची निंदा सुद्धा केली नाही, अशी टीका केली. परिणामी सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणा दिली. त्यावेळी पुढे बसलेल्या अजित पवारांनी रावते यांना मुख्यमंत्र्यांचा धिक्कार नाही तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशी घोषणा द्या, असं म्हणत रावते यांची चुक दुरूस्त केली. अजित पवार यांच्या प्रसंगसावधानतेची चर्चा सध्या राज्यभर होत आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षण, महिला सुरक्षा, पंतप्रधानांची नक्कल, आमदारांचं निलंबन यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाला. कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेवर भाजपनं निषेध केला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजवर जोरदार टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

“…तर राष्ट्रपती राजवट स्विकारावी अन् सगळा कारभार केंद्राकडे द्यावा”

IPL Auction चा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार मेगा लिलाव

काँग्रेसचा मंत्री बदलणार???, सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More