महाराष्ट्र मुंबई

राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

मुंबई | भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. जानेवारीमध्ये स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासमवेत त्या काम करतील. 

32 वर्षीय नीला विखे पाटील ह्या प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील.

अशी माहिती स्वत: अशोक विखे पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. नीला यांचा जन्म स्वीडन येथे झालेला असून, त्या स्टाॅकहोम महापालिकेच्या निवडणूक सदस्यही आहेत.

दरम्यान, नीला ह्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

-माझी पुन्हा फसवणूक केल्यास, सरकारला उघडं पाडू- अण्णा हजारे

सत्तेसाठी अर्धकमळ छातीवर लावून फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-नरेंद्र मोदी ‘जुमला राजा’ आणि त्यांची राजवट ‘चौपटराज’- राहुल गांधी

रणवीरचा अतिउत्साहीपणा नडला; चाहते जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या