बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना दिला सल्ला

रत्नागिरी | अतिवृष्टी झालेल्या रत्नागिरीमधील चिपळूण दौऱ्याची पाहणी करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला अरेरावी केल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. विरोधकांनीही या प्रकरणावरून भास्कर जाधवांवर टीका केली. यावरून मुख्यमंत्री भास्कर जाधवांना काय बोलले याबाबत भास्कर जाधवांनी माहिती दिली आहे.

रविवारी झालेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मला मुंबईला जाईपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस. आपल्यामधील शिवसैनिक जागा ठेवून पूरग्रस्तांच्या मदतीला जा, असा सल्लाल मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री व्यापारांशी बोलत होते त्यावेळी एक महिला आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं. त्यावेळेस पीडित महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या. मुख्यमंत्री त्यांना धीर देत होते मात्र त्यावेळी भास्कर जाधव आले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला बाकी काय तुझा मुलगा कुठंय अरे आईला समजव आईला समजव उद्या ये असं बोलले.

दरम्यान, भास्कर जाधव यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. भास्कर जाधव यांच्यावर सोशल माध्यमांवर टीकेची झोड उठली होती. या प्रकरणावर भास्कर जाधव म्हणाले की, ती महिला मला माझ्या मुलीसारखी आहे.

थोडक्यात बातम्या-

सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन

आईच्या अंगावर कुत्रा भुंकला, तरुणीला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना!

जाधवांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा आहे; चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

…तर मीराबाई चानूलाही मिळू शकतं सुवर्णपदक; जाणून घ्या नेमकं कसं!

भास्कर जाधवांच्या त्या वर्तनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More