Top News महाराष्ट्र सोलापूर

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

सोलापूर | आजकाल आपण एखाद्या गोष्टीची मागणी सरकारकडे करायची असल्यास निवेदनं देणं किंवा फार-फार तर आंदोलन करणं आणि मागणी मान्य करण्यासाठी उपोषण करणे अशा गोष्टी पाहिल्या आहेत. सोलापूरच्या एका वकिलांनी आपल्या मागणीचं पत्र थेट रक्ताने लिहून ते मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

तिऱ्हे मार्गे पंढरपूर ते सोलापूर जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याचे काम सार्वजनिक विभागातर्फे जाणीवपूर्वक टाळण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरहून येणारी अवजड वाहतूकही त्याच मार्गाने येत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांकडून वारंवार यासंबंधी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या हाती निराशाच आल्याने येथील वकील ॲड. विजयकुमार नागटिळक यांनी स्वतःच्या रक्ताने एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून आपली व्यथा मांडली आहे.

सध्या समाज माध्यमावर त्यांच्या या पत्राची चर्चा आहे. तसेच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. सरकारला रक्ताने पत्र लिहण्याचा उद्देश एवढाच की नागरिकांच्या अडचणीची गंभीरता सरकारच्या लक्षा त यावी आणि तात्काळ यावर तोडगा निघावा.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

…पण माझ्या शेतकऱ्यांसाठी मोदींचे अश्रू निघत नाहीत- सुप्रिया सुळे

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

 

Vijay

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या