पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड अ‌ॅडवोकेट्स बार असोसिएशनचा महेश लांडगे यांना पाठिंबा

Loading...

पुणे |  पिंपरी-चिंचवड अ‌ॅडवोकेट्स बार असोसिएशनने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महेश लांडगे यांनी पिंपरी न्यायालयासाठी आणि वकिलांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच वर्षात आग्रही भूमिका घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड अ‌ॅडवोकेट्स बार असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‌ॅड. सूनील कडुसकर, माजी अध्यक्ष अ‌ॅड. सुभाष चिंचवडे, अ‌ॅड. उत्तमराव चिखले,अ‌ॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते. मागील पाच वर्षाच्या काळात आमदार महेश लांडगे यांनी उत्तम काम केले आहे. न्यायालयाच्या इमारतीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच बार असोसिएशनला त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सहकार्य देखील केले आहे, असं अध्यक्ष अ‌ॅड. सुनील कडूसकर म्हणाले.

Loading...

बार असोसिएशनसाठी जागेची कमतरता असल्याचे आमदार महेश लांडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेकडून 25 हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली. त्यात फर्निचरसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देखील मिळवून दिला, अशी माहिती अ‌ॅड सतीश गोरडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड अ‌ॅडवोकेट्स बार असोसिएशनचा मतदान न करण्याचा निर्णय लोकशाहीला घातक ठरेल. बार असोसिएशनच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. उच्च न्यायालयाच्या परवानग्या मिळाल्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य होणार आहे. सर्व वकिलांनी मतदानावर बहिष्कार न टाकता लोकशाहीचा हक्क बाजावण्याची विनंती महेश लांडगे यांनी यावेळी केली.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या