बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वकिलांची फी, नुकसान भरपाई सत्ताधारांच्या खिशातून द्या; भाजपची मागणी

मुंबई |  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई उच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर भाजपने सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

शिवसेना नेतृत्वाने सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईमुळे राज्य सरकार तोंडघशी पडले. या प्रकरणी वकिलांचा खर्च आणि कंगनाला द्यावी लागणारी नुकसान भरपाई सत्ताधारांनी स्वत:च्या खिशातून द्यावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे”.

तसेच “सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशा प्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ

“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”

100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!

“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”

“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More