बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळासाहेबांबत राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं’; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

मुंबई | नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दी .बा. पाटील असं नाव देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यावरून त्यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे.

नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं, असं म्हणत शिवसेना आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ज्येष्ठे नेते दि. बा पाटील यांनी चांगलं काम केलं यात वाद नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू नये. या विमानतळाच्या नामकरणावर राजकारण बाजूला ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. बाळासाहेब हयात असते तर असा प्रश्नच उद्भवला नसता, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आलं नंतर ते सहारापर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव द्यावं असं मला वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

मोठी बातमी! शिवसेना आमदार संजय रायमुलकरांनी ‘या’ कारणाने घेतली धरणात उडी; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More