बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते; विमानाच्या आतले फोटो धक्कादायक

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील नागरिक जीव वाचवण्यासाठी आता धडपड करत आहेत. काबुल विमानतळाच्या धावपट्टीवर नागरिक चक्क विमानाच्या मागे धावायला लागलेत. काही जणांनी जीव धोक्यात घालून विमानाच्या टायर आणि लॉन्डिंग गिअरला लटकण्याचा प्रयत्न केला. मात्र अशाही परिस्थितीत विमानाने टेक ऑफ केला. ज्या विमानामध्ये बसण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्या विमानाच्या आतले फोटो आता समोर आले आहेत.

तालिबानच्या जुलमी राजवटीखाली जगण्यापेक्षा अफगाणिस्तानमधील नागरिक आता देशाबाहेर जात आहे. कुणी देशाच्या संरक्षण भिंतीवर चढून बाहेर जात आहे तर कुणाला जो मार्ग मिळाला तो पकडून लोक देशामधून पळून जात आहे. अशातच अमेरिकेच्या सैन्याचे कार्गो विमानाची प्रवासी क्षमता १३४ होती. परंतु अफगाणिस्तानमधून जीव वाचवण्यासाठी त्या विमानात बसलेल्या तब्बल ६४० नागरिकांचे भयावह परिस्थितीमधील फोटो आता समोर आले आहेत.

अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “काबूल विमानतळावर जेव्हा आम्ही हवाई दलाच्या सी-१७ जेट विमानाचा दरवाजा उघडला. तेव्हा नागरिकांनी विमानात बसण्यासाठी प्रचंड झुंबड केली. लोक आपल्या जीवाचा विचार न करता विमानात बसण्यासाठी धडपड करत होते. इतक्या प्रचंड क्षमतेने विमान उड्डाण करेल की नाही, अशी शंका होती.  मात्र विमानाच्या क्रूने कोणत्याही प्रवाशाला बाहेर काढले नाही. जवळपास ६४० लोकांचा जीव धोक्यात घालून विमानाने उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे तैनात असलेल्या सैनिकांनी गर्दीला पांगवण्यासाठी काबूल विमानतळावर गोळीबार केला. यात जवळपास ५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर विमान टेक ऑफ करत असताना विमानाला लटकलेले काही जण विमानातून खाली पडल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा ते धक्कादायक फोटोज-

थोडक्यात बातम्या-

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला मदत करा!, अफगाणी विद्यार्थ्यांची विनवणी!

शहा-मोदींना भेटूनही पंकजा मुंडे नाराज?, त्यावर दानवेंनी केलं मोठं विधान

राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; पुढील 3 दिवस महत्वाचे

“डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढतोय मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More