बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगानिस्तानच्या पळपुट्या राष्ट्रपतींचा छडा लागला, कुटुंबासह लपलेत इथं!

अबुधाबी | तालिबानने कब्जा मिळवण्याअगोदर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी देश सोडला होता. गनी यांनी रविवारी देशातील जनतेला वाऱ्यावर सोडत त्यांनी पलायन केलं होतं. मात्र अशातच त्यांच्या ठिकाण्याची जागा समजली आहे.

अश्रफ गनी देश सोडून गेल्यावर कुठे गेलेत आहेत?, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नव्हती. गनी यांनी देश सोडताना एक फेसबुक पोस्ट करत आपण देश सोडून का चाललो आहोत याबाबत माहिती दिली होती. तालिबान विजयी झाला असून देशात रक्तपात होऊ नये यासाठी मी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला, अस गनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

गनी यांच्याबाबत माहिती समजत असून ते संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईमध्ये आपल्या कुटुंबासोबत युएईमध्ये आहेत. माणुसकीच्या दृष्टीकोनातून आम्ही गनी आणि त्यांच्या कुटुंबाला आसरा दिल्याचं युएईने सांगितलं आहे. याबाबत युएईमधील सरकारी वाहिनी डब्लूएएमने परराष्ट्र मंत्र्यांचंं निवेदन प्रसारित केलं आहे. मात्र निवेदनामध्ये गनी हे युएईमध्ये कुठे आहेत याची कोणतीही माहिती दिली नाही.

दरम्यान, अश्रफ गनी यांनी देश सोडताना पैशाच्या बॅगा आणि हेलिकॉप्टरने पलायन केलं असल्याचं माहिती एका वृत्तसंस्थेने दिली होती. मात्र पडक्या काळात जनतेला सोडून गेल्यामुळे अफगाणिस्तानची जनता गनी यांच्यावर नाराज आहे.

थोडक्यात बातम्या- 

संभाजी ब्रिगेडनं दिलं ‘हे’ चॅलेंज, राज ठाकरे चॅलेंज स्वीकारणार का?

तालिबानला आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अमेरिका ‘अशी’ जिरवणार खोड!

‘तो’ टाईमपास आता बंद करा; उदयनराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

MG मोटर्सनं भारतात लाँच केली जबरदस्त गाडी, इच्यात जे ते कुणातच नाही!

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More