बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

काबुल | तालिबानने अफगाणचं जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त करून टाकलंय. संसद, राष्ट्रपतींच निवासस्थान, मंत्रालय, यांची पार दैना करून टाकली आहे. तालिबानने कब्जा मिळवल्यावर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला होता. घनी एका विशेष विमानाने आपल्या कुटुंबासोबत पळून गेले.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून रोज काही न काही घडतंय. अशात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडल्याचं कळतंय. यामुळे घनी यांच टेंशन वाढलं आहे.

ग्रँड कौन्सिल ऑफ कुचिसचे प्रमुख हशमत घनी यांनी तालिबानला आपल्या पाठिंब्याची घोषणा केली तेव्हा तालिबानचा नेता खलील उर रहमान आणि धार्मिक स्कॉलर मुफ्ती महमूद झाकीर हे उपस्थित होते, अशी माहिती आहे.

दरम्या, अश्रफ गनी देश सोडून गेल्यावर कुठे गेलेत आहेत?, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नव्हती. गनी यांनी देश सोडताना एक फेसबुक पोस्ट करत आपण देश सोडून का चाललो आहोत याबाबत माहिती दिली होती. तालिबान विजयी झाला असून देशात रक्तपात होऊ नये यासाठी मी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला, असं गनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

थोजक्यात बातम्या- 

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

बॅालिवूड हादरलं, सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेलला अटक

येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशी ओढावलं मरण

“मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळाली, त्यांनी हे गटर बंद ठेवावं, अन्यथा….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More