बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. अलिकडेच अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळात सामील झालेले उच्च शिक्षण मंत्री अब्दूल बाकी हक्कानी यांनी अफगाण मुलींच्या शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती.  त्यात मुलींना शाळेमध्ये हिजाब परिधान करावा लागणार असं सांगितलं होतं. अशातच आता तालिबानकडून महिलांना ऑफिसमध्ये काम करण्याबाबत नविन नियम जारी करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये सरकार सत्ता स्थापन करण्यापूर्वी अफगाण महिलांना शरिया कायद्यानुसार काम करण्याची परवानगी दिली जाईल, असं तालिबानने म्हटलं होतं. परंतु आता महिलांना ऑफिसमध्येही जाण्याला तालिबानने विरोध केला आहे. त्याचबरोबर महिलांना बुरखा घालूनही ऑफिसला जाता येणार नाही. जगाने जरी आमच्यावर महिलांना काम करण्याचं स्वातंत्र्य देण्याबाबत दबाव निर्माण केला तरीही अफगाणिस्तान फक्त शरिया कायद्यानुसारच काम होईल, असं तालिबानचा कमांडर वहीदुल्लाह हाशिमी यांनी सांगितलं आहे.

आम्ही 40 वर्षे फक्त यासाठीच लढलो की, आम्हाला देशात शरिया कायदा लागू करायचा हवा. शरिया कायदा महिला आणि पुरूषांना एकत्र काम करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे महिला पुरूषांसोबत काम तर करू शकत नाहीत. त्यांना आमच्या कार्यालयांमध्येही येण्याची परवानगी नाही. त्यामुळे महिलांना पुरूषांसोबत काम करू दिलं जाणार नाही. देशात पुर्ण शरिया कायदा लागू केला जाईल, असं हाशिमी यांना सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्या ठिकाणांहून त्यांना हटवण्याची गरज आहे. त्याच बरोबर महिलांना काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वेगळी केंद्र उभारली जातील, असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अमरावतीच्या वर्धा नदीत मोठी दुर्घटना; बोट उलटून 11 जण बुडाल्याची भीती

कौतुकास्पद! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यानं वाटली ‘इतक्या’ हजार लोकांना मोफत पाणीपुरी

मास्क किती दिवस लावायचं???; नीती आयोगाने दिलं स्पष्टीकरण

देश जोडण्याबद्दल बोललं की लोकांना त्रास होतो- कंगणा राणावत

करुणा शर्मांना मोठा झटका, कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More