बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांना जूगारून अफगाणिस्ताच्या रणरागिणी उतरल्या मैदानात, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

काबूल | अफगाणिस्तामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तेथील नागरिकांना प्रचंड प्रमाणात समस्यांना तोंड द्यायला लागत आहे. लहान मुलांसह तेथील महिलाही अडचणीत सापडल्या आहेत. अशातच आता तालिबान शुक्रवारच्या नमाजानंतर नव्या सरकारची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये तालिबान आपला नेता घोषित करणार आहे. त्यामुळे तालिबानमध्ये जीव धोक्यात घालून महिला आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.

अफगाणिस्तानमध्ये फ्रिबा काबरजानी या महिलेच्या नेतृत्वाखाली महिलांनी राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. नव्या सरकारमध्ये महिलांचाही समावेश करावा. मंत्रिमंडळ आणि ज्येष्ठ समित्यांमध्ये स्थान मिळावं, अशा मागण्या  महिलांनी यावेेळी केल्या आहे.

अफगाण महिलांनी गेल्या वीस वर्षात जे काही मिळवलं आहे. त्यासाठी आम्ही प्रचंड त्याग केला आहे. या काळात महिलांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे तालिबानने महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी घ्यायला हवी. त्याचबरोबर सत्तेतही वाटा द्यायला हवा. संपूर्ण जगाने आमचा आवाज ऐकायला हवा, अशी आमची इच्छा आहे, असं काबरजानी म्हणाल्या.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील आंदोलक महिला म्हणाल्या की, आमच्या सर्व महिलांच्या वतीने आमचा आवाज तालिबानपर्यंत पोहचवत आहोत. या आंदोलनात अनेक महिलांना देखील सहभाग घ्यायचा होता. परंतु तालिबानच्या भीतीने त्या महिला सहभागी होऊ शकल्या नाहीत, असं आंदोलक महिला मरियम अब्राम यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

सुशांत प्रकरणानंतर पोलीस सावध, आता सिद्धार्थ प्रकरणात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांच्या रूग्णांमध्ये घट, वाचा आजची आकडेवारी

भारतातील ‘या’ ठिकाणांवर दहशतवाद्यांचा डोळा, गुप्तचेर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

“सरकारमधील लोक तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?”

मृत्यूच्या 6 दिवस आधी सिद्धार्थनं केलं होतं मोठं काम, तुम्हालाही अभिमान वाटेल!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More