“…त्यानंतर विराटने लग्न करायला पाहिजे होतं”, शोएब अख्तरने किंग कोहलीला डिवचलं
नवी दिल्ली | टी-ट्वेन्टी विश्वचषकामध्ये पाकिस्तानकडून भारताचा मानहानिकारक पराभव झाला. पाकिस्तानी खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंवर टीका होता आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीची कामगिरी आणि लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे. कोहलीने लवकर लग्न केल्यामुळे आणि लग्नाच्या दबावामुळेच विराटच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे, अशी टीका शोएब अख्तरने केली आहे.
120 शतके केल्यानंतरच विराट कोहलीने लग्न करण्याच्या निर्णय घ्यायला हवा होता, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे. अलीकडेच विराट कोहली आणि बीसीसीआय आमनेसामने आले होते. हे चुकीचं आहे का? असा प्रश्न अख्तरला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर शोएब अख्तरने सावध प्रतिक्रिया दिली आहे. हे बरोबर आहे की, चुकीचे आहे हे मला माहिती नाही. आता इथून पुढचा प्रवास कसा करायला हवा याबाबतचा विचार करायला हवा, असं अख्तरने म्हटलं आहे.
तसेच शोएब अख्तर म्हणाला की, विराट कोहलीकडे संधी आहेत. आता इथून पुढे त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये उतरावे लागणार नाही. आता कोहलीवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे. शोएब अख्तरला जर तुम्ही भारतामध्ये स्टार असता तर असाही प्रश्न पत्रकाराने केला होता.
भारतामध्ये मी स्टार आणि वेगवान गोलंदाज असतो तर मी कधीच लग्न केलं नसतं. मी क्रिकेटवर फोकस केला असता आणि 400 विकेट घेतल्या असत्या, असंही शोएब अख्तर म्हणाला आहे. मी माझ्या जबाबदाऱ्या कधीच वाढवत नाही हाच माझा निर्णय असतो. तसेच लग्नाचा निर्णय हा विराट कोहलीचा व्यक्तीगत निर्णय असल्याचंही शोएब अख्तरने म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! फक्त 30 मिनिटात जमवले 10 लाख अन्…
सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट येणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
“…तर अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू”
“लफडी करताना मला विचारलं होतं का?”; नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Comments are closed.