बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अमोल कोल्हेंनी आपल्या पायातील चप्पल चाहत्याला दिली

पुणे | कोणाचे चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही? शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमधून विजयी झालेल्या डॉ. अमोल कोल्हेंच्या चाहत्यानंही काहीसा वेगळा निर्धार केला.

अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार सदाशिव बेले या चाहत्याने केला होता. अमोल कोल्हेंनी स्वत:च्या पायातील चप्पल बेलेंना दिली. त्यानंतर पेढा भरवून मनापासून आभार मानले.

बेले हे वसमत तालुक्यातील धामनगाव येथील रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी सदाशिव यांनी कोल्हेंच्या विजयासाठी पण केला होता आणि तो पूर्णदेखील केला.

मराठवाड्यातील भर उन्हात अमोल कोल्हेंवरील प्रेमापोटी सदाशिव बेले हे जवळपास दोन महिने सर्वत्र अणवानीच फिरत होते.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा; प्रकाश आंबेडकरांची टीका

-शिवसेनेला भीक म्हणून पुन्हा अवजड उद्योग खातं मिळालं- निलेश राणे

-“जर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर…”

-…म्हणून मोदींनी मला पुन्हा तेच खातं दिलं- रामदास आठवले

-देशात गेल्या 45 वर्षातली सर्वात वाईट बेरोजगारी दर, GDP ही घसरला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More