अहमदनगर | राज्यालाच नाही तर सगळ्या देशाला दिशादर्शक असणार आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणुक झाली. त्यामुळे या गावच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागुन होतं.
30 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत ‘विकास पुरूष’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पोपटराव पवारांनी एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाल्याची माहिती आहे.
पोपटराव पवारांच्या विरूद्ध किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केला होता. 1990 पासून हिवरे बाजारात गुलालाची उधळण झाली नव्हती. यंदाच्या वर्षी ग्रामस्थांनी उत्साहात मतदान केलं.
दरम्यान, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागलं नाही किंवा पोलिंग एजन्ट नव्हतं.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये”
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!
…म्हणून ‘या’ गावात निवडणुकीचा निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत
“…त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं”
“शरद पवार यांच्या हृदयावरील ‘ही’ जखम भरून काढा”