तब्बल 6 वर्षांनी आर्ची आणि परश्यानं ‘तो’ सीन केला रिक्रिएट, पाहा भन्नाट व्हिडीओ
मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय चेहरे म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि अभिनेता आकाश ठोसर(Akash Thosar). दोघांनीही ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सैराटच्या घवघवीत यशानंतर दोघेही चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर दोघांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. अशातच रिंकू आणि आकाश पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
रिंकू आणि आकाश सध्या दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्सस्थ आहेत. झुंडच्या प्रमोशवेळी रिंकू आणि आकाशनं तो सहा वर्षांपूर्वीचा सैराटमधील सीन रिक्रिएट केला. सध्या सोशल मीडियावर त्या सीनचीच चर्चा होताना दिसत आहे.
सैैराट चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यातील डाॅयलाॅगनं अनेकांची मनं जिंकून घेतली. पुन्हा सहा वर्षानंतर रिंकू आणि आकाशनं त्यातला सीन रिक्रिएट केल्यानं चाहतेही खूप आनंदी झाल्याचं पहायला मिळत आहे. आकाश आणि रिंकूचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, तब्बल 6 वर्षांनंतर हा सीन रिक्रिएट करताना आर्ची आणि परश्याचा तोच अंदाज पुन्हा पहायला मिळाला. 6 वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली. ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्तानं रिंकू आणि आकाश पुन्हा एकत्र पहायला मिळाले.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर
मोदी सरकारचा नागरिकांना धक्का, या गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार?
‘..तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहिल’, पुतिन यांचा युक्रेनला थेट इशारा
“…म्हणून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर राग आहे”
“राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे”
Comments are closed.