बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

12 आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपची बैठक; बैठकीकडे सर्वांचं लक्ष

मुंबई | महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या काळामुळे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ उडाला असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठराव मंजूर करून घेत असताना विरोधकांनी विधानसभेत चांगलाच कडाडून विरोध केला व अध्यक्षांचा माईकही ओढला. या प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षासाठीची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. आधीच कमी दिवसांचा अधिवेशन होत असल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यात भाजप आमदारांवर झालेल्या कारवाईमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजप या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकी पुढची काय रणनीती ठरवली जाणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी हे तालिबानी सरकार आहे असं महाराष्ट्र सरकारला उद्देशून म्हटलं आहे.

भाजप आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईला भाजप कडून कडाडून विरोध केला जात असून भाजप नेत्यांची बैठक सुरु असून या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More