बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

पुणे | जागतिक लस उत्पादक कंपनी ‘सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला हे गेल्या महिन्यात लंडनला निघून गेले आहेत. यानंतर आता वडील सायरस पूनावालाही लंडनला रवाना झाले आहेत. सायरस पूनावाला हे सीरम इंस्टीट्यूट समुहाचे अध्यक्ष आहेत. आता वडिलांनीही आपल्या कुटुंबासमवेत लंडन गाठल्यामुळे पूनावाला परिवाराने देश का सोडला याचा तर्क वितर्क लावला जात आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरस पूनावाला म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येतो. त्यामुळे आता जी लोकं असं म्हणत आहेत की, मी आणि माझ्या मुलानं देश सोडला आहे. ते सर्व खोटं आणि मूर्खपणाचं आहे. ते पुढे म्हणाले की, मी दरवर्षी मे महिन्यात लंडनला येत असतो, असं पूनावाला यांनी सांगितलं.

पुण्यातील ‘सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ ही कंपनी सध्या कोरोना विषाणूवरील ‘कोविशिल्ड’ नावाची लस उत्पादीत करत आहे. देशातील एकूण 90 टक्के लस याच कंपनीत बनवली जात आहे. त्यामुळे देशाच लसीकरण करण्याची मोठी जबाबदारी आदर पूनावाला यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाब वाढत असल्याचही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आदर पूनावाला यांना फोन करून दबाब टाकणारे ते शक्तशाली लोकं नेमकी कोण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात गुढ बनून राहिला आहे.

दरम्यान, आदर पूनावाला गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये वास्तव्याला असून ते युरोपमध्ये लस निर्मितीचे नवीन युनिट सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. याची पुष्टी पुन्हा एकदा सायरस पूनावाला यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

कोरोनामुळे ‘या’ तालुक्यातील दोन कुटुंबे उद्ध्वस्त, आठ दिवसांत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

तौक्ते चक्रीवादळाचा यंदाच्या मान्सूनला होणार फायदा

कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More