बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअर इंडियानंतर मोदी सरकारने आता ‘ही’ कंपनी काढली विकायला!

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने (Modi Government) एअर इंडीयाचं खासगीकरण (Air India Privitization) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एअर इंडीया टाटा कंपनीला विकण्यात आली. मात्र मोदींच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला होता. अनेकांनी तर ‘मोदी देश विकायला काढत आहेत’ असा आरोपही केला होता. असं असतानाच आता मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीच खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने आता सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेचं CEL (Central Electronics Limited) कंपनीला नंदल फायनान्स अँड लीजिंगला (Nandal Finance And Leasing) विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सोमवारी CELला 120 कोटी रुपयांना विकण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी सरकारी कंपनीची विक्री ठरणार आहे.

CEL च्या विक्रीचा करार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुर्ण होणार आहे. CEL च्या खरेदीसाठी दोन कंपन्यानी बोली लावली होती. जेपीएम इडंस्ट्रीजने 190 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर गाझियाबादच्या नंदल फायनान्स अँड लीजिंगने 210 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे आता CEL ला नंदल फायनान्सला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, CEL कंपनीची स्थापना 1974 मध्ये करण्यात आली होती. CEL कंपनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कंपनीने एक्सल काऊंटर सिस्टम विकसित केली आहे, ज्याचा उपयोग सिग्नलिंग सिस्टममध्ये ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी होतो. याशिवाय कंपनीने सोलर फोटोव्होल्टाईक्स क्षेत्रात देखील नाव कमावले आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More