Top News देश

अखिलेश यादव यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांना कोरोना लसीवर शंका, म्हणाले…

नवी दिल्ली | काँग्रेसच्या नेत्यांनी लसीला परवानगी देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. लसीला परवानगी देण्यासाठीची नियमांना बदलण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते शशी थरुर आणि जयराम रमेश यांनी केला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लसीला मान्यता देण्याचा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याविषयी ट्विट करत सरकारला आपली भूमिक स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

भारता बायोटेक ही एक उत्तम गुणवत्ता असणारी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. मात्र या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या फेज-3 च्या ट्रायलसाठी प्रक्रिया मूळ नियमांत पदल करण्यात येत आहेत. हे चकित करणारं आहे, असं माजी मंत्री जयराम रमेश यांनी म्हटलंय.

कोव्हॅक्सीन या लसीला परवानगी देण्यावरुन माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनीदेखील आक्षेप नोंदवला आहे. चाचणी आधीच कोरोना लसीला परवानगी देणं घातक असू शकतं असं त्यांनी म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

“अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु”

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

‘ही तर टाटा, बिर्लांची सेना’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या