बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर पाकड्यांनी राग काढलाच! न्यूझीलंडच्या किवी खेळाडूंना डिवचलं; पाहा व्हिडीओ

मुंबई | टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्ताने दारूण पराभव केला आहे. त्यानंतरही न्यूझीलंडवर देखील पाकिस्तानने 5 गडी राखून विजय मिळवला. मात्र हा सामना संपल्यानंतर न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनला पाकिस्तानच्या चाहत्यांकडून भर मैदानात डिवचण्यात आल्याची घटना घडली आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकपुर्वी न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सो़डून परतला होता. त्यावेळी त्यांनी सुरक्षेचे कारण देत नाणेफेकीच्याच वेळी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी वक्तव्य केलं होतं. भारतानंतर आमचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ हा न्यूझीलंड असणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचाच राग चाहत्यांनी काढला आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सामना संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पव्हेलियनच्या दिशेने जात होता. तेव्हा गर्दीमधून ‘सिक्युरीटी सिक्युरीटी’ असा आवाज करत पाकिस्तान संघाचे चाहते त्यांना डिचवत होते. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तान संघाला 135 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तेव्हा पाकिस्तानने 18.5 षटकामध्ये 135 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं होतं.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांसाठी केन विल्यमसनने मदत केली होती. त्यावेळी त्यांनी एका सामनेचे पुर्ण पैसे पाकिस्तानला दिले होते. त्यामुळे सोशल मीडियावर केन विल्यम्सनच्या या दोन्ही गोष्टीची चर्चा सध्या सुरू आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

“सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात पण त्यांना मेंदू नाही”

‘देशाला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या भाडेतत्वावर मिळालंय’; भाजप प्रवक्त्याचा जावईशोध

शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली

“एकनाथ खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या पातळीचे समजायचे मग पराभव का झाला?”

मोठी बातमी! नीरज चोप्रासह अन्य 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More