बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

नवी दिल्ली | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरिंदरसिंग यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू टीका करत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दुफळी स्पष्टपणे दिसत होती. आता अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण?, यावर काँग्रेसकडून दोन नावं आघाडीवर आहेत.

यामधील पहिलं नाव म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड आणि दुसरं नाव प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची नाव घेतली जात आहेत. यामागे तशी कारणंही आहेत. सुनिल जाखड हे हिंदू समाजाचे आहेत. त्यांचे वडील बलराम कुमार जाखड हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव आहे. त्यासोबत काँग्रसे नेते राहुल गांधी यांचे जाखड जवळचे मानले जातात.

अमरिंदरसिंग यांच्या जागी काँग्रेस शिख चेहरा देणार असेल तर नवज्योत सिंग सिद्धू यांचं नाव घेतलं जात आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी अमरिंदरसिंग यांच्यासोबत काम करण्यास नकार कळवला होता. त्यानंतर सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती.

दरम्यान, माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. दोन महिन्यात तीनदा आमदारांना बोलावण्यात आलं. ज्यांच्यावर पक्षनेतृत्वाला विश्वास त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येईल. राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल. माझे पाठीराखे, समर्थक यांच्याशी बोलेल. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रिपदी होतो आता योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनाम्यावर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More