बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहांच्या चॅलेंजनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात महापालिकेसाठी रणशिंग फुंकले. यावेळी 150 जागांचे टार्गेट भाजपने ठेवलं आहे. त्यानंतर आज लगेच शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलीये.

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांनीही शिवसेना शाखाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.

पालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केलं आहे. अमित शहा यांनी  केलेलं वक्तव्य आणि भाजपकडून सुरू असलेली तयारी याचाही आढावा या बैठकीत घेतला जाईल.

दरम्यान, अमित शहा यांनी युती तोडण्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

‘तेव्हा तुम्ही सी ग्रेड फिल्ममध्ये…’; शिवसेनेचा नवनीत राणांवर घणाघात

“ज्यांच्याकडे 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा”हा 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More