Top News महाराष्ट्र मुंबई

अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. अशातच कंगणा आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यामध्ये शाब्दिक चकमक चालू आहे. यामध्ये अभिनेते बच्चन यांच्यानंतर मलाच कॉपी केलं जात  असल्याचं कंगणाने म्हटलं आहे.

तापसीने कंगनाची कॉपी केलं, असं एका चाहत्याने ट्विट केलं होतं. त्यानंतर हे ट्विट कंगणाने रिट्विट केलं.  हा हा हा मी खूश आहे. ही माझी खरी चाहती आहे. हिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यावर रिसर्च करण्यात घालवलं आहे. या सगळ्यांमुळे मी निराश वगैरे अजिबत नाही. बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केले जाते, असं कंगणा म्हणाली. त्यानंतरही कंगणाने आणखी एक ट्विट केलं.

या जीनिअसआधी माझे भविष्य काय होतं?, हिने मला चिंतीत केलं आहे. हिच्याबद्दल विचार केला तरी मला ईर्ष्या होते. दुसऱ्याचं मला माहित नाही पण ज्या जगात अशी कला, सौंदर्य आणि असे टॅलेंट आहे, त्या जगात राहायची माझी इच्छा नसल्याचं कंगणा म्हणाली. यावर तापसीनेही कंगणाला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, एका सक्षम आणि आत्मविश्वासू व्यक्तिला कोणत्याही गोष्टीपासून ईर्ष्या होत नाही. ईर्ष्या स्थिर असते आणि ते माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचे लक्षण असल्याचं तापसी पन्नू म्हणाली.

 

 

थोडक्यात बातम्या-

बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस

‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”

“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”

मनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या