Top News नाशिक महाराष्ट्र

कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय

Photo Credit- Twitter / @DGPMaharashtra

 नाशिक | देशभरासह राज्यातील कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात लॉकडाऊनचा तर काही जिल्ह्यांमध्ये संचारंबदीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्यापासून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आाला आहे. यासंदर्भात नागपूरचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा निर्णय घेतला असून त्यांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्यापासून रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत संचारबंदीची घोषणा करत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाचा धोका वाढतोय त्यामुळं नियमांचं पालन करा, मास्क न वापरल्यास 1000 रुपये दंड भरावा लागणार, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही छगन भुजबळ यांनी दिला.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणं नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारं नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील अरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेत कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर

काँग्रेसच्या जनआक्रोश राॅलीत डान्सरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी- गणेश नाईक

आधी माझा देश, जगाने धीर धरावा – अदार पुनावाला

अभिनेत्री प्रिया बापटचं पारंपरिक अंदाजातलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे अदाकारी फोटोज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या