“अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर….”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रावादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. अशातच आता मलिकांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा नंबर लागणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसतंय.
ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज सकाळपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिकांची चौकशी सुरू आहे. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या –
“पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांना आम्ही काय सांगणार?”
मोठी बातमी! अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक
“नवाब मलिकांची राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करायला लावणार”
“वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत कोरोना सापडला त्याचा मालक बिल गेट्स”
“नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका”
Comments are closed.