बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या ईडी चौकशी चालू आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे 3 समन्स दिल्यानं अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू झाली होती. त्यातच आता अनिल देशमुख यांचे सुपुत्र ‘सलिल देशमुख’ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांचे द्वितीय सुपुत्र सलील देशमुख यांना देखील सक्तवसुली संचलनालयाकडून लवकरच समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. सलील देशमुख यांच्या कंपनीने उरण तालुक्यात खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास करण्यास ईडीने सुरुवात केली आहे. त्यामुळे सलिल यांना देखील ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागण्याची शक्यता आहे.

सलील देशमुख यांनी खरेदी केलेल्या 15 भूखंडांची चौकशी ईडी करत आहे. हे भूखंड प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे खरेदी केले गेले आहेत. मात्र, या सलिल देशमुख यांची नियंत्रित भागीदारी आहे. उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार हे जमीन व्यवहार 2006 ते 2015 दरम्यान झालेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या कागदपत्रांनुसार ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर सध्या 100 कोटी घोटाळ्याची चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सलिल यांच्यावर जमीन करार प्रकरणी 300 कोटींची तलवार लटकण्याची शक्यता आहे. सलील देशमुख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषद निवडणूकीत सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले होते.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More