बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यनच्या सुटकेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं शाहरुखसाठी खास ट्विट, म्हणाली…

मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरणात मागील 26 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत होता. आज अखेर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. आज अखेर 27 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर आला आहे. आर्यनच्या सुटकेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं शाहरुखच्या समर्थनार्थ एक खास टि्वट केलं आहे.

आर्यन खानच्या सुटकेनंतर उर्मीला मातोंरडकरनं केलेलं ट्विट काही क्षणांतच सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. या ट्विटमध्ये उर्मीलानं शाहरुखचं कौतुक केलं आहे. ‘कुठल्याही व्यक्तीचं खरं चारित्र्य कठीण काळात दिसतं. या कठीण काळात जी सभ्यता, परिपक्वता आणि शक्ती तू दाखवलीस, त्यामुळे तू माझा सहकारी आहेस, याचा मला अभिमान वाटतो. तू खरंच खूप बेस्ट आहेस’, असं ट्विट उर्मीलानं शाहरुखच्या समर्थनार्थ केलं आहे.

सध्या हे ट्विट व्हायरल होत असून सोशल मीडियावर सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणातील सुनावणी रखडत चालल्यानं त्याला दिवाळीला जामीन मिळेल का नाही याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. मात्र त्याची सुटका झाल्यानंतर आता सगळेच प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, आर्यनच्या सुटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला जात आहे. इतकंच नाही तर शाहरुख खानचे चाहते आर्यनच्या सुटकेने आनंदी आहेत आणि त्याला पाहण्याच्या आशेने ‘मन्नत’ बाहेर गर्दी करत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

T20 World Cup: करायला गेला रोनाल्डोची काॅपी, अन्….

“सतेज पाटलांनी लाखोंचं मुद्रांक शुल्क बुडवून सरकारची फसवणूक केली”

‘4 दिवसाच्या वाळक्या भाकऱ्या खातोय साहेब’; पाहा एसटी कर्मचाऱ्याची दयनीय अवस्था

डेल्टा व्हेरिएंटविषयी संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

पुनित राजकुमार यांच्या आयुष्यातील ‘ही’ खास व्यक्ती भारतात आल्यानंतरच होणार अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More