बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारताला महासत्ता बनायचं असेल तर…’; नितीन गडकरींनी दिला मोलाचा सल्ला

नागपूर | भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या शिक्षकांविषयीच्या आठवणी असतात. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोलतांना शिक्षकांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

शिक्षक आणि विद्यार्थांच्या नात्यावर नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे. शिक्षकांचा मार खाल्यावर भाषणं करायला लागल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. मानवाचं जीवन तसेच भविष्य बदलण्याची ताकद शिक्षणात असं नितीन गडकरी म्हणाले. भारताला जर महासत्ता बनायचं असेल तर त्यासाठी चांगले विद्यार्थीं घडविणे आवश्यक आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

आपल्या भारतात एक संस्कृती आहे. उच्चशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं यात मोठी तफावत असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं .त्यामुळे आपण सुशिक्षित बनत असतांना सुसंस्कृत बननं महत्त्वाचं आहे. पाश्चात्य देशांमध्ये भारतासारखी संस्कृती आढळत नाही, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे कोणीच माणूस शंभर टक्के परिपुर्ण नसतो. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येकामध्ये काहीतरी गुणदोष असतात. जेव्हा आपण सोडून जाऊ त्यावेळेस आपण केलेल्या कामाची स्तुती लोकांनी करायला हवी.तर नागपूरला प्रदुषण मुक्त करायचं असल्याचा निर्धार यावेळी गडकरींनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या-

‘देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तालिबान जबाबदार’; भाजप आमदाराचा अजब दावा

गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ पत्रात ‘किंबहुना’ शब्दाचा 6 वेळा वापर; विजय वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर!

“करुणा शर्मांनी दिलेला मजकूर प्रकाशित करणं न्यायालयाचा अवमान”, मुंडेंच्या वकिलांचं माध्यमांना पत्र

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल आढळलं, पोलिसांकडून तपास सुरु

पत्रकार परिषदेपूर्वी करूणा शर्मा मुलासह स्थानबद्ध; परळीत तणावाचे वातावरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More