बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोनदा कोरोना झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आजारी, केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

अकोला | अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमी त्यांच्या मतदारसंघामध्ये सतत फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पाॅझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी स्वत:ची चाचणी करावी व काळजी घ्यावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील 3 दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे. परंतु डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे, असं देखील त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदीचा निर्णय सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

सचिननंतर आता भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण!

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

…म्हणून दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड याचं नाव चर्चेत!

ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची स्थिती भीषण, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More