बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

नवी दिल्ली | देशात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर इकडे राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या सर्व विषयांवर भाजप नेते आणि नव्याने राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेले विनोद तावडे (Vinod Tawade ) यांनी मत मांडलं आहे.

राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार असून महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील. दिल्ली आणि इतर राज्याच्यां समन्वयाचं काम माझ्याकडे असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय आता मी मोदींच्या टीमचा भाग झालो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालेल’, असं देखील ते म्हणाले आहेत.

राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘2019 ला तिकीट कापल्यानंतर पक्षाचे काम केले. पक्ष देईल ते काम करण्याची वृत्ती ठेवल्यामुळेचं मला ही संधी मिळाली. त्यामुळे यापुढे माझी जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर राहिल. राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळाली याचा आनंद आहे,” असंही ते म्हणाले.

देवेंद्रे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलताना ही भेट केवळ राज ठाकरेंच्या नव्या घराच्या पार्श्वभूमीवर घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय देशात कृषी कायदे मागे घेण्यासंबधी विचारले असता सरकारने कोणत्याही भीतीखाली हे कायदे मागे घेतले नाहीत. तर देशाच्या हिताचे वाटले म्हणून केवळ कायदे मागे घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

एसटी संपाचा तिढा सुटणार का?; गोपीचंद पडळकर म्हणाले…

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More