बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

मुबंई | शिंदे यांच्या बंडानंतर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी आमदारांविरोधात मोर्चा काढला होता. यावेळी ते ढसाढसा रडलेही होते. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी शिवसेनेकडून (Shivsena) मतदान केलं. मात्र अचानकपणे यू टर्न घेत आमदार संतोष बांगरे हे एकनाथ शिंदेच्या गटात गेले.  बहुमतचाचणीवेळी त्यांनी शिवसेना विरूद्ध मत दिलं. त्यांच्या या निर्णयाने सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.

त्यांच्या या निर्णयामुळे हिंगोलीतील सतंप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांना शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यानंतर पक्षाकडून कारवाई करत संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख (District Head) पदावरुन हटवण्यात आलं आहे. पक्षविरोधात कारवाई केल्यानं आता  जिल्हाप्रमुख पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

यानंतर संतोष बांगर म्हणाले मी अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे. या कारणास्तव ते आज शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळत नसल्यांच्या आणि हिदुत्वांच्या विचारांची फारकत होत असल्याचा आरोप आमदारांनी केला. कारण सांगत शिवसेनेन बंड पुकारलं. एकनाथ (Eknath Shinde) आणि 40 आमदारांनी केलेला बंड हा सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरला. यानंतर शिवसेनेची गळती सुरूच आहे. आजही उर्वरित आमदार पुन्हा बंड करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More