बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

मुंबई | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय.

बायडेन यांच्या विजयानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये आव्हाडांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्याच्या पावसातील सभेचा फोटो आणि बायडन यांचा फ्लोरिडातील फोटो शेअर केलाय.

याला फोटोसंदर्भात आव्हाड लिहितात, “पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरलाय. अखंडपणे केलेले कठोर परिश्रम आणि वचनबद्धता विजयी होते. आशा जिवंत आहेत.”

निवडणूकीच्या प्रचारादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी चांगलाच जोर लावला होता. यावेळी फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस असताना देखील त्यांनी सभा घेतली होती. ही सभा चर्चेचा विषय ठरली होती.

महत्वाच्या बातम्या-

अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात; पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार

सुरक्षेच्या कारणामुळे अर्णब गोस्वामी यांची रवानगी तळोजा कारागृहात!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जीवे मारण्याची धमकी

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

विजयानंतर जो बायडेन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन, म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More