बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

वॉशिंग्टन | अफगाणिस्तान हा अफू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश असल्यानं त्यातूनच अफगाणिस्तानला करांच्या रूपात पैसा येत असतो. तालिबान्यांचं ज्या भागात वर्चस्व आहे, त्या भागात अफूचं सर्वात जास्त उत्पादन होतं. त्यामुळे तालिबान्यांचे आर्थिक चक्र यावरच अवलंबून होतं. त्यानंतर तालिबान्यांच्या हिंसेमुळे अफगाणिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तानातील लोकशाही संपुष्टात आल्यानंतर तालिबान्यांनी आता नविन सरकार स्थापन केलं. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आता अफगाणी नागरिकांच्या मदतीसाठी सरसावली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी तब्बल 64 मिलीयन डॉलर्सची मदतीची घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानच्या टोलो वृत्तवाहिनीने या मदतीची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत असलेल्या लिंडा थाॅम्पसन ग्रीनफील्ड यांनी अमेरिकेच्या मदती म्हणजे मानवतावादी आहे असल्याचं म्हटलं. अफगाणिस्तानची परिस्थिती अत्यंत गंभीर असून भविष्यात परिस्थितीचा विचार करून अजून जास्त मदत केली जाईल, असं लिंडा थाॅम्पसन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या मदतीआधी चीननेही अफगाणिस्तानच्या सरकारला 200 मिलीयन युआन ( 31 मिलीयन डॉलर्स ) इतकी मदत जाहीर केली आहे. या जाहीर झालेल्या मदतीमध्ये अन्न पुरवठ्यासह कोरोना प्रतिबंधक लसींचाही समावेश आहे. अफगाणिस्तानला सुव्यवस्थित करण्यासाठी नविन सरकारची गरज होती, असं चीनने मदत करताना जाहीरपणे म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या –

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

“अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?”

भारताविरूद्ध पाकिस्तानची रणनीती! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More