बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले

मुंबई | एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्यकारभार सांभाळला. नवं सरकार आल्यानंतर आधीच्या सरकारचे निर्णय बदलणार की ते तसेच रहाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यानुसार या नव्या सरकारने दोन महत्वाचे निर्णय घतले आहेत.

शिंदे सरकारने आल्या आल्या ‘आरे’ मध्येच मेट्रो कारशेड होणार असल्याचं राज्यातच्या महाधिवक्त्यांना कळवलं आहे. आरेमध्येच मट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्त्यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती कळते. दुसरी महत्वाची माहिती म्हणजे राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याबाबत नव्या सरकारने निर्णय दिले आहेत.

सदर निर्णय ठाकरे सरकारच्या काळात चांगले गाजले होते. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. याविरोधात बरेच नागरीक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.

जलयुक्त शिवार योजना हा फडणवीस सरकारचा मोठा प्रकल्प होता. या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार असताना सातत्याने झाले. त्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. मात्र आता फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आदेश दिले गेले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मोठी बातमी! शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More