औरंगाबाद महाराष्ट्र

कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

बीड | कोरोना संपल्यावर मी राज्यभराचा दौरा करणार असल्याची घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर मी पक्ष सोडणार, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. या बातम्यांवर विश्‍वास ठेवू नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

माझं राजकारणातील, पक्षातील स्थान काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. पण माझ्या मनात एकही प्रश्‍न नाही. मी नव्या आत्मविश्‍वासाने जनसेवेसाठी लढणार असून कोरोनाचं संकट संपल्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मी खचून गेलेली नाही. दिवंगत मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यामुळे मी ही नव्या आत्मविश्‍वासाने पुन्हा लोकांच्या सेवेत जाणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू

“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

“आभाळ जरी कोसळलं तरी…, महाराष्ट्रा काळजी घे”

चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या