बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

तिरुवनंतपुरम | कोरोनानं गेल्या दीडवर्षांपासून जगभरात खळबळ माजवली. आता कुठे कोरोना नियंत्रणात येताना दिसत होता तर पुन्हा एकदा नवीन विषाणूचं संक्रमण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता निपाह व्हायरसच्या संकटाचीही यामध्ये भर पडली आहे.

केरळमध्ये एका मुलाचा निपाह व्हायरच्या संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं वय 12 वर्ष असून त्याला 3 सप्टेंबर रोजी या व्हायरसची लागण झाली होती. आता या मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. याशिवाय निपाह व्हायरसविषयी चाचणीही करण्यात येत आहेत.

निपाह व्हायरस हा वटवाघळाच्या लाळेतून पसरतो. जगभरात निपाह हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय.

दरम्यान, कोरोना विषाणूनंतर अनेक संसर्गजन्य विषाणू समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ होत असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशळेत पाठवण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘…त्यालाच तिकीट मिळणार’; राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसै आहेत, पण पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाहीत”

“RSS राष्ट्रीय बाण्याची संघटना, तालिबानशी तुलना आम्हाला मान्य नाही”

…नाहीतर कोरोनाच्या संकटातून आपण कधीच बाहेर पडणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More