बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एवढ्या’ दिवसांची सुट्टी, सरकारनं घेतला मोठा निर्णय!

तिरुवनंतपुरम | कोरोना काळात अनेकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपली नोकरी सोडावी लागली. याच पार्श्वभूमीवर आता केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात आला नसल्यानं तेथील राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

केरळमधील कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना झालेल्या रुग्णांना 7 दिवसांची विशेष सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोना झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी देण्याची तरतूद केली आहे. सरकारनं सर्व कर्मचार्‍यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालेली दिसत आहे. देशातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावी झालेले राज्य म्हणून केरळची ओळख बनली असून केंद्र सरकारनं मदतीसाठी वारंवार या राज्यात पथकं पाठवली आहेत.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात हॉस्पिटलमध्ये नातलग दाखल असल्यानं अनेक कर्मचार्‍यांनी कार्मिक मंत्रालयाकडे सुट्ट्यांबाबत विचारलं होते. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेता राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. केरळमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 44,46,228 वर पोहोचली आहे. तर मृत्यूंची संख्या 23,16 वर पोहोचली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“विकासाच्या नावावर उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”

बुस्टर डोसबाबत आरोग्य मंत्रालयानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी दिला तर…”

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता!

‘वयाची 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलंय’; अजित पवारांचा काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More