बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खोकल्यानंतर मोबाईल अ‌ॅप सांगणार कोणता आजार झालाय; जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई | कोरोना दिवसागणिक जास्त वाढत चालला आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेचे संकट वाढू लागलं आहे. अशातच कोरोनाची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. त्यामुळे अधिक चिंता लागून आहे.

आपल्याला साधा खोकला जरी आला तरी कोरोना झाला की काय याची भीती वाटू लागते. मात्र आता खोकल्यावरुन काय आजार झाला आहे हे तुम्ही ओळखू शकता. शास्त्रज्ञांनी एक असं मोबाईल अॅप तयार केलं आहे की ज्याच्यात खोकल्याच्या आवाजानं कुठला आजार झाला आहे हे ओळखता येऊ शकणार आहेे.

डेलावेअरमधल्या कंपनीकडून या अॅपची निर्मीती केली जात आहे, असं वृत्त दी वाॅल स्ट्रीट जर्नलमध्ये दिलं आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं हे अॅप खोकल्याच्या लाखो वेगवेगळ्या आवाजांचं रेकाॅर्डिंग करणार आहे. त्यामुळे व्यक्तीला कोणता आजार झाला आहे हे लवकर निदान होईल.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला अस्थमा, न्यूमोनिया, श्वासाचा त्रास, कोविड यांपैकी एखादा आजार झाला असेल, तर अॅप समोर ठेवून खोकल्यावर त्या व्यक्तीच्या आजाराचं नेमकं निदान होऊ शकणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

नितेश राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र, म्हणाले….

पहिल्यांदा हेल्मेट घालून विकत घेतलं होतं कंडोम’, ‘या’ अभिनेत्यानं सांगितला मजेशीर किस्सा

“नात्यांचे संदर्भ बदलत असतात, अगोदर महागाई चेटकीण वाटायची आज ती प्रेयसी झालीये”

‘रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ‘या’ आमदाराचं कोरोनामुळे निधन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More