बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डनंतर आता भारतात ‘ही’ लस देखील मिळणार मोफत

मुंबई | कोरोनाचा वाढणारा धोका पाहता लवकर देशभरात लसीकरण करण्याची गरज आहे. भारतात फक्त कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रशियाच्या स्पुटनिक-वी या लसीच्या वितरणासाठी परवानगी देण्यात आली होती. पण आता स्पुटनिक-वी लस भारतातच तयार होणार असल्यानं भारतीयांची चिंता दूर झाली आहे. त्यातच आता सर्वांसाठी चांगली बातमी समोर येत आहे.

रशियाची स्पुटनिक-वी लस आता भारतात मोफत मिळणार आहे. ‘सध्या स्पुटनिक-वी लस केवळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होती. आता सरकारद्वारे दिली जाणारी लस ही पुरवठ्यावर अवलंबून असणार आहे. आम्हाला ती मोफत लसीकरण मोहिमेतून उपलब्ध करणार आहोत’, अशी माहिती वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा यांनी दिली आहे. त्यामुळे आता गरिबातल्या गरिब व्यक्तीला देखील ही लस घेता येणार आहे.

पोलिओ लसीकरणामुळे काही भागात कोरोना लसीकरण धिम्या गतीनं झालं आहे. आता पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरण मोहिम वेगाने होईल. जुलैच्या अखेरीस 12 ते 16 कोटी डोस मिळतील. जानेवारीतच केंद्राने जुलैपर्यंत 50 कोटी डोस देण्यात येतील, असं सांगितलं आहे. आजवर 34 कोटी लसी टोचण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील डाॅ. अरोरा यांनी दिली आहे. तर पोलिओ प्रमाणे ग्रामीण भागात ही लस पोहचवली जाणार आहे.

दरम्यान,  रशियानं तयार केलेल्या स्पुटनिक लसीचे दोन डोस घेण्यामधील अंतर हे 21 दिवसांचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस 21 दिवसानंतर घ्यावा लागतो. सध्या खासगी रुग्णालयात स्पुटनिक-वी लसीच्या एका डोसची किंमत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. स्पुटनिक-वी लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…पण भाजपला हे मान्य आहे का?’ मोहन भागवतांचं कौतुक करत शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुस्लिम आरक्षणासाठी आठवले मैदानात; आज आझाद मैदानात रिपाइंचा एल्गार

‘एका चेंडूत सर्वाधिक बळी घेणारे भास्कर जाधव’; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

राज्य सरकारविरोधात भाजपचे 12 निलंबित आमदार मागणार न्यायालयात दाद!

निलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीत काय झालं?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More