बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ 7 शहरात’ महिंद्रांनी सुरू केली ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ सेवा

मुंबई | कोरोना महामारीच्या काळात अनेक उद्योगपती आणि कंपन्या देशाच्या मदतीला धावून आल्या आहेत. एका कंपनीचा जेवढा नफा होतो. त्यापैकी 2% नफा हा कंपनीला सामाजिक कामात वापरावा लागतो. त्यालाच सीएसआर फंड म्हणतात. याच सीएसआरचा पुरेपुर वापर करत महिंद्रा लाॅजिस्टिक या कंपनीने ऑक्सिजन ऑन व्हिल ही सेवा सुरू केली आहे. आता ही सेवा महाराष्ट्रातल्या 7 शहरात दिली जाणार आहे.

काही दिवसांपुर्वी महिंद्रा लाॅजिस्टिक या कंपनीने राजधानी दिल्लीत ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ ही सेवा सुरू केली होती. या सेवेमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादक आणि रुग्णालये किंवा वैद्यकीय केंद्र जोडण्याचं काम केलं जात आहे. ही सेवा महिंद्रा लाॅजिस्टिककडून मोफत देण्यात येत आहे. दिल्लीत यशस्वी सेवा पुरवल्यानंतर आता महिंद्रा लाॅजिस्टिकने आपला मुक्काम महाराष्ट्राकडे वळवला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर अशा शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आम्ही राजघाट आणि मायापुरी ऑक्सिजन डेपो येथून SOS ऑक्सिजन सिलेंडर्स रूग्णालयात नेत आहोत. आपला देश पुन्हा एकदा कोरोनाची नवी लाट झेलत आहे. अशा परिस्थितीत आपलं योगदान देण्याची संधी आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत. येत्या काही दिवसांत दिल्लीतील कामकाज वाढण्याबरोबरच आम्ही शेजारच्या केंद्रांवर पोहोचवत आहोत, असंही कंपनीने सांगितलं आहे.

दरम्यान, सेवा महिंद्रा लॉजिस्टिकच्या सीएसआर उपक्रमांतर्गत होईल, ज्याने या प्रकल्पासाठी प्रशासन आणि स्थानिक सरकारी संस्थांशी भागीदारी केली आहे. दिल्लीसह इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत शहरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरु असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली फक्त”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More