बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशातील मंदिरे पाडून मस्जिदी बांधल्या, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

नवी दिल्ली | आगामी काळात अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्व पक्ष आपली ताकद पणाला लावून निवडणुकीच्या तयारीला लागले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर सरधानचे आमदार संगीत सोम यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

सोम हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच, देशातील मंदिरे पाडून मस्जिद बांधल्या, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार, संगीत सोम यांनी म्हटलं आहे.

अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत, त्यामुळे ते इथे चालणार नाहीत. भारतात सर्वच हिंदू  असून हेच ते लोक आहेत ज्यांनी राम भक्तांवर गोळीबार केला होता. वाराणसीमध्ये साधूंवर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला होता. आता ही लोक माफी मागत आहे तरी कोण माफ करणार नसल्याचं देखील सोम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला साडेचार वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सरधानचे आमदार संगीत सोम यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-

करुणा शर्मा यांचा जामीन मंजूर; तब्बल 16 दिवसांनी न्यायालयाकडून सुटका

“पाकिस्तानी सैैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंह सिद्धूंचा पंजाबी भाऊ”

“बाॅलिवूड चित्रपटांमध्ये माझा फक्त फर्निचरसारखा वापर केला”

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More