बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राष्ट्रवादीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कर्नाटकमधील बंगळुरुमधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या  (Chatrapati Shivaji Maharaj)  पुतळ्याची विटंबना करण्यात आली. गुरुवारी रात्री महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला. या घटनेनं शिवप्रेमी (ShivPremi) आक्रमक झाले आहेत. पूर्ण देशभरात याते तीव्र पडसाद उमटताना आहेत.

कर्नाटकमधील या घटनेनं सगळीकडे निषेध सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आता राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी ट्विट करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माहिती दिली.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जाऊन महाराजांना दुधाचा अभिषेक करतील, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न, अशा गोष्टी होत आहेत. त्यामुळे आता यावर शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झाला नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More