बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

मुंबई | आयपीएलमध्ये सध्या चेन्नई सुपर किंग्स संघ उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये सलग 5 सामन्यात विजय मिळवून चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. आयपीएल सामन्यात उल्लेखनीय फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड या मराठमोळ्या खेळाडूवर माजी भारतीय क्रिकेटपटूने कौतुकाची थाप दिली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ऋतुराज गायकवाड याच्यावर स्तुतीसुमनं वाहिली आहेत. “ऋतुराज खूप आरामात खेळतो आणि घाईघाईत फलंदाजी करत नाही, त्याचबरोबर त्याच स्ट्राईक रेट कडेही बरोबर लक्ष असतं. वाटेल तेव्हा बॅकफूटवर तसेच फ्रंटफूटवर जाऊन तो धावा करू शकतो, यापूर्वी विराट कोहली असा खेळत होता आणि अजुनही खेळतोय”, अशा शब्दात सेहवागने ऋतुराज गायकवाड याचं कौतुक केलं.

सेहवाग ऋतुराजचं कौतुक करताना इथेच थांबला नाही तर त्याने ऋतुराज जर असाच खेळत राहिला तर पुढच्या दोन-तीन वर्षात तो धोनीच्या जागेवर चेन्नई सुपर किंग्जची धुरा सांभाळेल, अशा शब्दात मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास वीरेंद्र सेहवागने व्यक्त केला आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादच्या संघाला 7 गडी राखून चांगलीच धूळ चारली होती. त्यामुळे आता चेन्नई संघ मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचं या आयपीएलच्या पर्वात पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

रेमेडेसिविर इंजेक्शनचे दुष्परिणाम उघड; ‘या’ जिल्ह्यात इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश

गृह विलगीकरणात असलेल्यांनी कोरोना चाचणी करावी की नाही?; केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More